"काय गं श्वेता, काय झालं? अशी रडतेस काय?, काय म्हणाले सर? काही वेडंवाकडं बोलले का?" प्रीतीने प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली. आणि मी दाटलेल्या कंठाने काहीही बोलूच शकत नव्हते. शिकवणी ते बसस्टॊप पूर्ण दहा मिनिटांच्या रस्त्यात अखंड डोळे वाहत होते. आणि गोंधळलेली, घाबरलेली प्रीती, माझी जिवलग मैत्रीण मला सावरायचा प्रयत्न करत होती, तेही मी का रडतेय याची काहीच कल्पना नसताना!
"बाबा, या विषयाला कॉलेजमध्ये शिकवायला चांगले शिक्षक नाहीत, तसे ते कोणत्याच विषयाला नाहीत. पण या विषयाचं जरा अवघड आहे. आणि पुढे करिअरसाठीही हाच विषय पक्का होणं आवश्यक आहे." - मी.
"किती असेल फी?" बाबा जरा चिंतेतच म्हणाले.
"पहिले तीन दिवस शिकवणीला जाऊन बसायचं आणि शिकवलेलं आवडलं तर पुढे सगळी फी दोन टप्प्यात भरून शिकवणी चालू ठेवायची. आठ हजार रुपयांची व्यवस्था दहा दिवसांत होईल का? तीन आणि पाच असे करून?" मी जरा चाचरतंच विचारलं.
आपल्याला ही फी परवडणारी नाही हे आधीच ठाऊक होतं तरीही धीर करून बाबांना विचारलं.
"बघतो जमतंय का". बाबाही विचारात पडले.
"नसेल जमत तर काहीच हरकत नाही बाबा, मी प्रीतीकडून समजून घेईन सगळं, आणि तीही मला नाही म्हणणार नाही. आतापर्यंत बऱ्याच वेळा अशी मदत केलीये तिने मला". बाबांना ओझं देऊन माझ्याच काळजावर धोंडा ठेवल्यासारखं वाटत होतं मला!
"जा बंड्या तू क्लासला, मी बघतो फीचं" बाबांनी माझं दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला.
मी त्याच दिवशी प्रीतीबरोबर पहिल्या दिवसाचा वर्ग पूर्ण केला. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला होते. त्या विषयासाठी शिकवणी लावणं अगदी आवश्यकच होतं. आणि जडेजा सर तिथले सर्वात उत्तम शिक्षक होते. ते अतिशय कमर्शियल म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या शिकवणीला सगळी श्रीमंतांचीच मुलं दिसायची नेहमी. त्यांची फी देखील तशीच जास्त होती. सुरुवातीचे तीन हजार तीन दिवसांनी भरले. ४५ दिवसांचा कोर्स होता. पुढची रक्कम सात दिवसात भरणं आवश्यक होतं.
"श्वेता, आज तुझा फी भरण्याचा शेवटचा दिवस आहे ना?" बाबांनी मी आठवण न करताच विचारलं. मी हो म्हणाले.
"मी तुमच्या सरांना आज दुपारी येऊन भेटून जाईन" - बाबा
"म्हणजे तुम्ही दुपारी माझी फी भरणार का?" - मी
"हो, दुपारपर्यंत होईल काहीतरी."
खरंच पैशांची व्यवस्था झालीये, की बाबा मला उगीच धीर देत आहेत? माझं मलाच कळेना.
संध्याकाळी शिकवणीला जायला निघालो आणि प्रीतीने माझी अस्वस्थता ओळखली. तिच्यापासून काहीच लपून नव्हतं.
"श्वेता काळजी नको करूस, उद्यापासून तुला नाही जमलं तरी कॉलेजमध्ये अर्धा तास जास्त थांबून सरांनी शिकवलेलं मला समजेल तसं तुला सांगत जाईन मी, सरांसारखं नक्कीच जमणार नाही. पण तुझं तरी कमीत कमी नुकसान होईल गं." मी खरंच इतकी भाग्यवान होते, प्रीतीसारखी मला समजून घेणारी, माझ्यासाठी तळमळ असणारी मैत्रीण मला मिळाली होती. नाहीतर स्वत:च्या घरचं सगळं छान असेल तर इतरांच्या गरिबीची खिल्लीच उडवताना सगळे दिसतात हल्ली!
शिकवणी सुरु झाली, सरांनी फी शिल्लक असलेल्या मुलांची फी भरण्यासाठी नावं वाचायला घेतली. प्रत्येक नावागणिक पुढचं नाव माझंच असेल असं वाटत होतं, आणि कानांवर दुसरं नाव पडलं की यापुढचं तर नक्कीच असेल अशी खात्री वाटत होती. पण पूर्ण यादीत माझं नाव नव्हतं. प्रीती आणि मला दोघींनाही खूप आनंद झाला. त्या दिवशी वर्गात मी सगळ्यात जास्त उत्तरं दिली. वर्ग संपला आणि सगळे निघताना सरांचा आवाज आला,
"श्वेता, आप मुझे ऑफिस में मिलना". आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. प्रीती म्हणाली,
"तू ये बोलून, मी वाट बघते बाहेर, नंतर एकत्रच जाऊया".
ऑफिसमध्ये जाऊन पोहोचले, मनात खूप धाकधुक होती की सरांना काय बोलायचं असेल. थोडा वेळ वाट पाहीली. तेवढ्यात सर आले आणि म्हणाले,
"तुझे बाबा भेटले मला, तुझ्या फीच्या अडचणीबद्दल सांगितलं. तू आजिबात काळजी करू नकोस, शिकवणीच्या शेवटच्या दिवशी तुला फी भरायला जमली तरी चालेल. आणि समजा तेव्हाही नाही जमलं, तर जेव्हा तुला नोकरी लागेल तेव्हा तुझ्या पगारातून नंतर तू मला पैसे आणून दे." (ते हिंदीतच बोलत होते)
हे ऐकलं आणि त्यांचा चांगुलपणा पाहून मला दाटून आलं, त्याच दाटलेल्या आवाजात त्यांना फक्त धन्यवाद दिले, अजून जास्तीचं काही बोलताच आलं नाही मला. आणि ऑफिसमधून बाहेर पडल्याक्षणी डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं.